एक्स्प्लोर
Asian Games 2018 : पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्ण-रौप्य
एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या 800 मीटर्स शर्यतीत भारताच्या मनजीत सिंगने सुवर्ण, तर जिन्सन जॉन्सनने रौप्य पदकाची कमाई केली.
जकार्ता : भारताचे धावपटू मनजीतसिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी एशियाडमध्ये भारताची मान उंचावली. पुरुषांच्या 800 मीटर्स शर्यतीत मनजीतने सुवर्ण, तर जिन्सनने रौप्य पदकाची कमाई केली. भारताच्या खात्यात नवव्या सुवर्णपदकाची भर पडली आहे.
मनजीतसिंगने या शर्यतीत 1.46.15 मिनिटांची सर्वोत्तम वेळ दिली आणि सुवर्णपदकाची कमाई केली. जिन्सन जॉन्सननं मनजीतपेक्षी 20 मिलीसेकंद उशिरा येत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. त्याने 1.46.35 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.
एशियाडमध्ये पुरुषांच्या आठशे मीटर शर्यतीत भारताने एकाचवेळी दोन पदकं पटकवण्याची ही तिसरी वेळ आहे. 1951 मध्ये रणजीत सिंग (सुवर्ण), कुलवंत सिंग (रौप्य) यांनी तर 1962 मध्ये दलजीत सिंग (रौप्य) अम्रित पाल (कांस्य) यांनी अशी पदकं पटकावली होती.
एशियाडमध्ये पुरुषांच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारा मनजीतसिंग हा सहावा भारतीय ठरला आहे.
दुसरीकडे, कुराश या तुर्किश मार्शल आर्ट प्रकारात मालाप्रभा जाधवने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. तिला 52 किलो गटाच्या उपान्त्य फेरीत उझबेकिस्तानच्या खेळाडूकडून हार स्वीकारावी लागली.
भारताने कमावलेल्या नऊ सुवर्णपदकांपैकी तीन अॅथलीट्सनी मिळवले आहेत. भारताच्या खात्यात एकूण 47 पदकं असून त्यामध्ये 17 रौप्य आणि 21 कांस्यपदकांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement