T20 World Cup 2022: ख्रिस गेलनंतर युवराज सिंह षटकारांचा किंग; टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी
Most sixes in T20 World Cup: भारतीय संघ हा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील ‘पहिला संघ’ आहे.
Most sixes in T20 World Cup: भारतीय संघ हा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील ‘पहिला संघ’ आहे. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतानं 5 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवत टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय संघानं 2014 मध्ये खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली होती. या सामन्यात भारताच्या पदरात निराशा पडली. मात्र, तेव्हापासून भारतीय संघानं टी-20 क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक भारतीय संघ आणखी एकदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. टी-20 विश्वचषकासाठी प्रत्येकानं आपपल्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश केल्यानं ही स्पर्धात आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी पाहुयात.
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. टी-20 विश्वचषकात ख्रिस गेलनं 33 सामन्यात 63 षटकार मारले आहेत. या यादीत भारताचा तुफानी फलंदाज युवराज सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहनं टी-20 विश्वचषकातील 33 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात 33 षटकार ठोकले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर 31 षटकारांची नोंद आहे. त्यानंतर या यादीत डेव्हिड वार्नर चौथ्या, शेन वॉटसन पाचव्या, एबी डिव्हिलियर्स सहाव्या, जोस बटलर सातव्या, ड्वेन ब्राव्हो आठव्या, महिला जयवर्धने नवव्या आणि जेपी ड्युमिनी दहाव्या क्रमांकावर आहे.
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी-
क्रमांक | नाव | संघ | सामने | षटकार |
1 | ख्रिस गेल | वेस्ट इंडीज | 31 | 63 |
2 | युवराज सिंह | भारत | 31 | 33 |
3 | रोहित शर्मा | भारत | 33 | 31 |
4 | डेव्हिड वॉर्नर | ऑस्ट्रेलिया | 30 | 31 |
5 | शेन वॉटसन | ऑस्ट्रेलिया | 24 | 31 |
6 | एबी डिव्हिलियर्स | दक्षिण आफ्रिका | 30 | 30 |
7 | जोस बटलर | इंग्लंड | 21 | 26 |
8 | ड्वेन ब्राव्हो | वेस्ट इंडीज | 34 | 25 |
9 | महिला जयवर्धने | श्रीलंका | 31 | 25 |
10 | जेपी ड्युमिनी | दक्षिण आफ्रिका | 25 | 23 |
टी-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.
हे देखील वाचा-