Dushmantha Chameera Ruled Out : श्रीलंकेला मोठा झटका, दुष्मंता चमीरा दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार, 'या' खेळाडूला मिळाली संधी
Asia Cup 2022 : आशिया कपला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत असताना श्रीलंका संघाचा महत्त्वाचा गोलंदाज दुष्मंता चमीरा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेला मुकणार आहे.
Asia Cup : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच श्रीलंका संघाला एक मोठा झटका बसला आहे. त्यांच्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेला मुकणार आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरु होणार असून सर्व संघ या भव्य स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. पण आधी भारताचा जसप्रीत बुमराह मग पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी असे मुख्य गोलंदाज स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता श्रीलंकेचाही मुख्य गोलंदाज दुष्मंता चमीरा बाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान दुष्मंता चमीरा याच्या जागी श्रीलंकेच्या 20 सदस्यीय संघात नुवीन थुशारा (Nuwan Thushara) याला संधी देण्यात आल्याची महितीही समोर येत आहे. दुष्मंता चमीरा याने त्याच्या प्रदर्शनाने सर्वांनाच आतापर्यंत प्रभावित केलं आहे. यासोबतच त्याने आयपीएल 2022 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेच्या या खेळाडूने आतापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. चमीराने 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.27 च्या सरासरीने आणि 8.14 च्या इकॉनॉमीने 48 विकेट घेतल्या आहेत. अशामध्ये त्याच्या या कमाल कामगिरीनंतर त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण आता तो दुखापतग्रस्त झाल्याने श्रीलंकेच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.
Fast bowler Dushmantha Chameera ruled out of Sri Lanka's Asia Cup squad following an injury (on his left leg) during practices. Sri Lanka Cricket Selectors brought in Nuwan Thushara into the 20-man squad.
— ANI (@ANI) August 22, 2022
(Pic: Sri Lanka cricket) pic.twitter.com/dfJ6rarCUp
कसं आहे वेळापत्रक?
यंदा भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...
सामना | दिवस | दिनांक | संघ | ग्रुप | ठिकाण |
1 | शनिवार | 27 ऑगस्ट | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका | बी | दुबई |
2 | रविवार | 28 ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | ए | दुबई |
3 | मंगळवार | 30 ऑगस्ट | बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान | बी | शारजाह |
4 | बुधवार | 31 ऑगस्ट | भारत विरुद्ध पात्र संघ | ए | दुबई |
5 | गुरुवार | 1 सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश | बी | दुबई |
6 | शुक्रवार | 2 सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ | ए | शारजाह |
7 | शनिवार | 3 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | शारजाह |
8 | रविवार | 4 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
9 | मंगळवार | 6 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 | सुपर 4 | दुबई |
10 | बुधवार | 7 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
11 | गुरुवार | 8 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
12 | शुक्रवार | 9 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
13 | रविवार | 11 सप्टेंबर | सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
हे देखील वाचा-
- AB de Villiers on Kohli : कोहली खराब फॉर्ममध्ये, पण तो इतिहासातील एक महान क्रिकेटर एबी डिव्हिलीयर्सकडून पाठराखण, म्हणाला...
- IND vs ZIM, Match Highlights : झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाची झुंज व्यर्थ, भारत 13 धावांनी विजयी, मालिकाही 3-0 ने खिशात