VIDEO : स्फोटक फलंदाज ऋषभ पंतची फटकेबाजी, जोडीला जाडेजाही जोमात
Asia Cup 2022 : 27 ऑगस्ट पासून युएईमध्ये आशिया कप 2022 स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. या महास्पर्धेत भारतही आपले तगडे शिलेदार घेऊन उतरत आहे.
Team India at Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आपले तगडे शिलेदार घेऊन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली उतरत आहे. केएल राहुल उपकर्णधार असून विराट, दिनेश, आश्विन, जाडेजा हे अनुभवी खेळाडू तसंच अर्शदीप, आवेश, पंत या युवांसह अगदी दमदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे भारत स्पर्धा जिंकण्याची दाट शक्यता आहे. त्यात स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूही कसून सराव करत आहेत. बीसीसीआयने सर्व खेळाडूंचे नेट्समधील फोटो पोस्ट केले असून आता बीसीसीआयने ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांचा नेटमध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये पंत आणि जाडेजा करत असलेली आतषबाजी अगदी डोळे दिपवणारी आहे. या व्हिडीओतून हे दोघेही आशिया कपमध्येही अशीच फटकेबाजी करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पाहा VIDEO
Whack Whack Whack at the nets 💥 💥, courtesy @imjadeja & @RishabhPant17 👌👌#TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/FNVCbyoEdn
— BCCI (@BCCI) August 26, 2022
कसं आहे वेळापत्रक?
आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
कुठे होणार लाईव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग?
आशिया कप 2022 मध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. त्यामुळे आशिया कप 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर विविध भाषांमध्ये पाहता येईल. याशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. तसंच सर्व अपडेट्स एबीपी माझाच्या साईटवरही तुम्हाला मिळणार आहेत.
हे देखील वाचा-