Virat Kohli: मेन्टल हेल्थ बाबतच्या प्रश्नावर विराट कोहलीनं सोडलं मौन!
Virat Kohli On Mental Health: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) गेल्या आठवड्यात एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत मेन्टल हेल्थवर भाष्य केलं होतं.
Virat Kohli On Mental Health: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) गेल्या आठवड्यात एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत मेन्टल हेल्थवर भाष्य केलं होतं. "माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्येही मला कधीकधी एकटेपणा जाणवतो", असं विराट कोहलीनं त्यावेळी म्हटलं होतं. या मुलाखतीच्या 10 दिवसानंतर विराट कोहलीनं स्टार स्पोर्ट्सला (Star Sports) एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्यानं पुन्हा एकदा मेन्टल हेल्थवर भाष्य केलंय. त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या कमजोर झालो होतो, असं त्यानं म्हटलं आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट कोहली म्हणाला की, "मला मानसिकदृष्या खूप दृढ आणि मजबूत समजलं जातं. परंतु, प्रत्येकाला मर्यादा असतात. याच मर्यादा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. मात्र, हे आपल्यासाठी हानिकारक ठरतं. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. हे मान्य करण्यास मला कसलीही लाज वाटत नाही. मानिसिकदृष्या खचणं ही साधारण गोष्ट आहे, जी आपण स्वीकारली पाहिजे. कमकूवत असल्याचं कबूल करण्यापेक्षा मजूबत असल्याचं दाखवणं हे फारच वाईट आणि घातक आहे.”
ट्वीट-
विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. आशिया चषकात विराट कोहली चांगली कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा आहे.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.
हे देखील वाचा-