एक्स्प्लोर

Asia Cup 2022: आणखी एका खास विक्रमाला गवसणी घालण्यासाठी बाबर आझम उतरणार मैदानात!

Asia Cup 2022: यूईएमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकाला आजपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होत आहे.

Asia Cup 2022: यूईएमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकाला आजपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (28 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) ऐकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्याकडं असतील. टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठण्यापासून बाबर आझम 120 धावा दूर आहे. 

बाबर आझमनं आतापर्यंत 219 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 45.28 च्या सरासरीनं आणि 128 च्या स्ट्राईक रेटनं 7 हजार 880 धावा केल्या आहेत. ज्यात सहा शतक आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून फक्त शोएब मलिकला टी-20 मध्ये 8000 धावांचा टप्पा गाठता आलाय. 

मोहम्मद रिझवानकडं टी-20 मध्ये 5000 धावा करण्याची संधी
बाबर आझम व्यतिरिक्त मोहम्मद रिझवानकडंही टी-20 क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे.  रिझवाननं आतापर्यंत 187 टी-20 सामन्यात 41.95 च्या सरासरीनं 4 हजार 909 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठल्यास मोहम्मद रिझवान शोएब मलिक, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, उमर अकमल, अहमद शहजाद आणि कामरान अकमल यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवेल.

ख्रिस गेल टी-20 क्रिकेटचा बादशाह
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज ख्रिसच्या नावावर आहे. ख्रिस गेलनं आतापर्यंत 463 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 36.22 च्या सरासरीनं 14 हजार 562 धावा केल्या आहेत. ज्यात 22 शतक आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डनं 604 टी-20 सामन्यात 11 हजार 783 धावा केल्या आहेत. 

सहा संघात रंगणार आशिया चषकाची स्पर्धा
आशिया कप 2022 स्पर्धेचे सामने टी20 फॉर्मेटमध्ये खेळवले जाणार आहेत. यंदा सामन्यांचा विचार करता आधी ग्रुप स्टेमधील सामने आणि त्यानंतर राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. तर आता आशिया कपचा पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे. यावेळी ग्रुप स्टेजचे सामने 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत खेळवले जातील. यामध्ये भारत आपला एक सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध तर दुसरा 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळेल. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये  श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेंकाविरुद्ध भिडतील. आता ग्रुप स्टेजमध्ये टॉप 2 वर असणारे प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. ग्रुप स्टेजनंतर सुपर 4 मध्ये आलेले चारही संघ राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळतील. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहेत.    

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget