Asia Cup 2022: आशिया कपचं लाईव्ह ब्रॉडकास्ट 132 देशांमध्ये पाहता येणार? कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग, वाचा सविस्तर
IND vs PAK 2022: आशिया कप 2022 चं बिगुल वाजलं आहे. अफगाणिस्तानने श्रीलंकेला मात दिली असून आता भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
![Asia Cup 2022: आशिया कपचं लाईव्ह ब्रॉडकास्ट 132 देशांमध्ये पाहता येणार? कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग, वाचा सविस्तर On this channel you can watch live streaming of asia cup 2022 matches Asia Cup 2022: आशिया कपचं लाईव्ह ब्रॉडकास्ट 132 देशांमध्ये पाहता येणार? कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग, वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/b22bc26228654934e12e376a3d1c25a0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asia Cup 2022 Live Broadcast & Streaming : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) सुरू झाला आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना 28 ऑगस्टला होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची जितकी चर्चा होत आहे ते पाहता ही स्पर्धा पाहणाऱ्या चाहत्यांची संख्या नवा विक्रम करणार असं दिसून येत आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने असतील, तेव्हा 132 देशांचे चाहते तो सामना लाईव्ह पाहू शकतील. भारत आणि पाकिस्तान या देशांशिवाय अन्य देशांचे क्रिकेटप्रेमीही या सामन्यासाठी उत्सुक असल्याने 132 देशांमध्ये हा सामना पाहण्याची सुविधा करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट प्रेमी कुठे पाहू शकतात सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामना पाहता येऊ शकतो. यावेळी रवी शास्त्री, इरफान पठाण, गौतम गंभीर, रसेल अर्नोल्ड, दीप दासगुप्ता, स्कॉट स्टायरिस, संजय मांजरेकर, वसीम अकरम, वकार यूनुस, अतहर अली खान हे दिग्गद कॉमेन्ट्री बॉक्मध्ये दिसतील.
आशिया कप 2022 ची लाईव्ह स्ट्रीमिंग
भारत: स्टार स्पोर्ट्स, डिज्नी+हॉटस्टार, डीडी स्पोर्ट्स
पाकिस्तान: पीटीवी स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स. दारज़ आणि तपमाडीवर लाईव्ह स्ट्रीमिंग
बांग्लादेश: गाझी टीव्ही (जीटीवी)
ऑस्ट्रेलिया: फॉक्स स्पोर्ट्स
न्यूझीलंड: स्काय स्पोर्ट्स
दक्षिण आफ्रिका: सुपरस्पोर्ट नेटवर्क
यूएसए, कॅनडा, उत्तर अमेरिका: विलो टीवी
यूके: स्काय स्पोर्ट्स नेटवर्क
मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्र: ओएसएन स्पोर्ट्स क्रिकेट एचडी
अफगाणिस्तान: एरियाना टीवी
कॅरेबियन: फ्लो टीवी
कसं आहे उर्वरीत ग्रुप स्टेजच्या सामन्यांचं वेळापत्रक?
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)