IND vs SL, Asia Cup LIVE : श्रीलंकेचा भारतावर सहा विकेटनं विजय
Asia Cup 2022, Match 9, IND vs SL: सुपर 4 मध्ये श्रीलंकाने अफगाणिस्तानचा पराभव करत यशस्वी सुरुवात केली आहे. तर भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागलाय.
LIVE
Background
Asia Cup 2022, Match 9, IND vs SL: आशिया चषकातील सुपर-4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात सामना रंगणार आहे. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीलंकाविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. हा सामना गमावल्यास भारताला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागेल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर 4 मधील तिसरा सामना आज (6 सप्टेंबर) खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातासपूर्वी नाणेफेक होईल. सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं अफगाणिस्तानचा पराभव केला. अशा स्थितीत श्रीलंकेच्या संघाचं मनोबल वाढलं असेल.
भारताचा आशिया चषक 2022 मधील प्रवास
भारतानं विजयानं आशिया चषक 2022 ची सुरुवात केली होती. भारतानं पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. तर, दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला होता. मात्र, सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? ही भारतासाठी सर्वात मोठी चिंता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात काही बदल पाहायला मिळू शकतात
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता
पाकिस्तानविरुद्ध भारतीय क्रिकेट संघात तीन बदल करण्यात आले होते. दिनेश कार्तिक, आवेश खान आणि रवींद्र जाडेजा यांना वगळण्यात आलं होतं. तर, त्यांच्या जागी दीपक हुडा, रवी बिश्नोई आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलं. पाकिस्तानविरुद्धची कामगिरी पाहता भारतीय संघात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळू शकते, ज्याला राखीव संघात जोडण्यात आलंय.
भारत-श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 25 टी-20 आतंरराष्ट्रीय सामने खेळले गेले. यातील भारतानं 17 सामने जिंकले आहेत. तर, 7 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. यावर्षी भारत आणि श्रीलंका यांच्याती तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. ही मालिका भारतानेच जिंकली होती.
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संभाव्य संघ:
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना/प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.