IND vs PAK, Asia Cup 2022 Live Streaming : पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी, कुठे पाहाल सामना?
India vs Pakistan T20 : भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आशिया कप 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून मात दिली होती.
India vs Pakistan Live : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत पुन्हा एकदा रंगणार आहे. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
कधी आहे सामना?
उद्या अर्थात 4 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकातील सुपर 4 मधील सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार (Hotstar) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
अक्षरच्या जागी दीपक हुडाला संधी द्या - वसिम जाफर
भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. अक्षरने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. पण दीपक हुडाला संघात संधी दिल्यास त्याच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने व्यक्त केला आहे. दरम्यान आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
पाकिस्तानचा संघ:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-