(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK Live Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स
IND vs PAK Super 4, Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये आमने-सामने येणार आहेत.
LIVE
Background
IND vs PAK Super 4, Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 4 मधील दुसरा सामना खेळला जाईल. याआधी दोन्ही संघांमध्ये ग्रुप स्टेजमध्ये सामना झाला होता. ज्यात भारतानं पाच विकेट्सनं विजय मिळवला होता. अशा स्थितीत या दोन देशांमधील लढत रंजक ठरण्याची शक्यता आहे.
यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करून या स्पर्धेची विजयी सुरूवात केली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर गुंडाळलं. भारतानं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना मंगळवारी 4 सप्टेंबर ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठं आणि कसं पाहू शकतात?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आर अश्विन.
पाकिस्तानचा संभाव्य संघ:
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रउफ, हसन अली.
हे देखील वाचा-