एक्स्प्लोर

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यातील अनेक टर्निंग पॉईंट, कुधी-कुठं सामन्यानं बदललं रूप?

IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळवलाय.

IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळवलाय. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 19.4 षटकांत पूर्ण केलं.

भारत-पाकिस्तान सामन्यातील टर्निंग पॉईंट

पाकिस्ताननं 42 धावांत दोन विकेट्स गमावले
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या संघानं 42 धावात दोन विकेट्स गमावले. भुवनेश्वर कुमारनं तिसऱ्याच षटकात कर्णधार बाबर आझमला (10 धावा) बाद केलं. त्यानंतर आवेश खाननं फखर जमानला (10 धावा) बाद करून माघारी धाडलं.

पांड्यानं रिझवान- इफ्तिखार यांची भागेदारी तोडली
दरम्यान, मोहम्मद रिझवान आणि  इफ्तिखार अहमदनं तिसऱ्या विकेट्ससाठी 38 चेंडूतत 45 धावांची भागेदारी केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं इफ्तिखारला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडं झेलबाद करून ही भागेदारी तोडली. इफ्तिखारनं 22 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 28 धावा केल्या. इफ्तिखारला बाद केल्यानंतर हार्दिकनं पुन्हा सीमारेषेवर रिझवानला आवेश खानकडं झेलबाद करून पाकिस्तानला चौथा धक्का दिला. रिझवाननं 42 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 43 धावा केल्या. 

भुवनेश्वर कुमार, हार्दिक भेदक गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघानं 19.3 षटकात सर्वबाद 147 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं चार आणि हार्दिक पांड्यानं तीन विकेट्स घेतल्या.

केएल राहुलला माघारी धाडून पाकिस्तानची सामन्यात वरचढ
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. 

रोहित शर्मा विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला
केएल राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेट्ससाठी 46 धावांची भागेदारी झाली. 

रोहित- विराटला बाद करून पाकिस्तानचं कमबॅक
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत होते. परंतु, पाकिस्ताननं रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीला माघारी धाडून सामन्यात जोरदार कमबॅक केलं.  या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहलीनं 35 धावा केल्या.

रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याची दमदार फलंदाजी
भारतानं चार विकेट्स गमावल्यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी केली. 

अखेरचे दोन षटक ठरले अधिक रोमांचक
भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात 21 धावांची गरज होती. परंतु, 19 व्या षटकात भारतानं तीन चौकारांसह 14 धावा काढल्या. ज्यामुळं अखेरच्या षटकात भारताला फक्त सात धावांची आवश्यकता होती. परंतु, अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात जाडेजा आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकनं एक धाव काढत स्ट्राईक हार्दिक पांड्याला दिली. परंतु, तिसरा चेंडू निर्धाव गेल्यानं चाहत्यांची धाकधूक वाढली. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget