(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suryakumar Yadav: 6,6,6,0,6,2; अखेरच्या षटकात सूर्यानं हाँगकाँगच्या गोलंदाजाला धू- धू धुतलं!
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium)खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) चौथ्या सामन्यात भारतासमोर हाँगकाँगच्या (IND vs HK) गोलंदाजांनी गुडघे टेकले.
Suryakumar Yadav: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium)खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) चौथ्या सामन्यात भारतासमोर हाँगकाँगच्या (IND vs HK) गोलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून हाँगकाँगसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं. हाँगकाँगविरुद्ध भारताचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवची बॅट तळपल्याची पाहायला मिळाली. या सामन्यात त्यानं 26 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली. तर, अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला.
अखेरच्या षटकात सुर्यकुमार शो!
भारताच्या डावातील 20व्या आणि अखेरच्या षटकात हाँगकाँगकडून हारून अर्शद गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकतील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सुर्यकुमार यादवनं गोलदाजावर दबाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. परंतु, चौथ्या चेंडू निर्धाव ठरला. मात्र, पाचव्या चेंडूवर सुर्यानं आणखी एक चेंडू सीमारेषाबाहेर पाठवला. त्यानंतर अखेरच्या षटकात दोन धावा काढल्या. अशा सूर्यकुमार यादवनं 26 धावा कुटल्या.
ट्वीट-
विराटचं अर्धशतकानंतर चाहत्यांना दिलासा
गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीनं आज हॉंगकाँगविरुद्ध खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील चौथ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहली भारतीय संघातील महत्वाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. यापूर्वी विराट कोहलीचं फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी महत्वाचं आहे.
संघ-
भारत प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन:
निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी (विकेटकिपर), जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर
पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला होता. तसेच आजच्या सामन्यात हाँगकाँगला पराभूत करून भारताचा सुपर-4 फेरीत स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल. अफगाणिस्तान आधीच सुपर-4 साठी पात्र ठरला आहे, तर भारत हा एकमेव संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचं विजयाचं खातं उघडलेलं नाही.
हे देखील वाचा-