Asia Cup 2022: विराटच्या भविष्याबाबत चाहत्यांनी शाहिद आफ्रिदीला विचारलं; पाहा काय मिळालं उत्तर?
Shahid Afridi on Virat Kohli: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सोशल नेहमीच मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.
![Asia Cup 2022: विराटच्या भविष्याबाबत चाहत्यांनी शाहिद आफ्रिदीला विचारलं; पाहा काय मिळालं उत्तर? Asia Cup 2022 Shahid Afridi makes blunt five-word statement on Virat Kohli's 'future' Asia Cup 2022: विराटच्या भविष्याबाबत चाहत्यांनी शाहिद आफ्रिदीला विचारलं; पाहा काय मिळालं उत्तर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/d95dd312e5a9a8d1f19b8fb343f9a1e91661149815329266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahid Afridi on Virat Kohli: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सोशल नेहमीच मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. दरम्यान, शाहिद आफ्रिदीनं रविवारी ट्विटर लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यातील काही प्रश्न विराट कोहलीशी (Virat Kohli) संबंधित होते. चाहत्यांच्या प्रश्नांना शाहिद आफ्रिदीनं काय उत्तर दिलं? हे पाहुयात.
ट्वीटर लाईव्हदरम्यान शाहीद आफ्रिदीनं विराट कोहलीच्या भविष्य कसं असेल? असा प्रश्न विचारला. यावर शाहिद आफ्रिदीनं "हे त्यांच्यावर कामगिरीवर अवलंबून असेल", असं उत्तर दिलं. यादरम्यान दुसऱ्या चाहत्यानं विराट कोहलीच्या शतकांच्या दुष्काळाबाबत मुद्दा मांडला. विराटला शतक झळकावून 1000 हून अधिक दिवस उलटले आहेत, असं तो म्हणाला. यावर "मोठा खेळाडू फक्त कठीण काळातच ओळखला जातो", असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.
ट्वीट-
ट्वीट-
शाहिद आफ्रिदीची विराट कोहलीवर टीका
शाहिद आफ्रिदीनं अनेकदा विराटच्या फॉर्मवर टीका केलीय. दोन महिन्यांपूर्वी त्यानं विराटच्या प्रदर्शनावर पश्नचिन्ह उपस्थित केले होते. क्रिकेटमध्ये वृत्ती सर्वात महत्त्वाची असते. विराटला त्याच्या कारकिर्दीत अव्वल बनायचं होतं. काय आताही तो हेच लक्ष्य ठेवून मैदानात उतरतो का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो उत्कृष्ट फलंदाज आहे, पण खरंच त्याला अव्वल बनायचं आहे का? किंवा तो असा विचार करतो की त्यानं आयुष्यात सर्वकाही मिळवलं आहे. आता फक्त टाईमपास करायचा आहे.
विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)