IND vs MAS, Asia Cup Hockey : भारत विरुद्ध मलेशिया सामना ड्रॉ, दोन्ही संघानी लगावले 3-3 गोल
हॉकी आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारताने जपानचा पराभव केल्यानंतर आता मलेशियाविरुद्धचा सामना मात्र अनिर्णीत सुटला आहे.
India vs Malaysia Asia Cup Hockey 2022 : भारतीय हॉकी संघाचा हिरो हॉकी आशिया कपच्या (Hero Asia Cup 2022) सुपर 4 मधील आजचा सामना अनिर्णीत सुटला आहे. समोर मलेशियाचं आव्हान असताना भारताने 3 गोल लगावले पण मलेशियाच्या खेळाडूंनीही 3 गोल केल्यामळे अखेर दोन्ही संघातील सामना अनिर्णीत सुटला आहे.
आता पुढील लढाई कोरियाविरुद्ध
भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. इंडोनेशियावर तगड्या विजयाच्या जोरावर सुपर 4 मध्ये एन्ट्री मिळाल्यानंतर आधी जपानला भारताने 2-1 ने मात दिली. आधी जपानने भारताला 5-2 ने मात दिली होती. पण सुपर 4 मध्ये भारताने पराभवाचा वचपा काढला. ज्यानंतर आता मलेशियाविरुद्ध सामना अनिर्णीत सुटल्यानंतर भारताची पुढील मॅच कोरियाविरुद्ध असेल. मंगळवारी 31 मे रोजी हा सामना पार पडणार आहे.
आतापर्यंतच्या स्पर्धेत भारत
या स्पर्धेत दोन पूल असणार आहेत. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून एका गोलची आघाडीू कायम ठेवली होती. पण अखेरच्या काही मिनिटांत पाककडून गोल करण्यात आल्याने सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या सामन्यात मात्र जपानने सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. भारताने महत्त्वपूर्ण दोन गोल केले पण तोवर जपानने आघाडी वाढवल्याने अखेर भारत 5-2 ने पराभूत झाला. त्यानंतर आज भारताने 16-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली. ज्यानंतर सुपर 4 फेरीत पहिल्या सामन्यात भारताने जपानला 2-1 ने मात दिल्यानंतर आज मात्र मलेशियाविरुद्धचा सामना अनिर्णीत सुटला.
हे देखील वाचा-