Asia Cup Hockey 2022 : भारताने कांस्य पदकावर कोरलं नाव, जपानला पुन्हा चारली धूळ
Asia Cup Hockey 2022 : आशिया कपमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलेय. भारताने पुन्हा एकदा जपानचा 1-0 असा पराभव केला.
Asia Cup Hockey 2022 : आशिया कपमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलेय. भारताने पुन्हा एकदा जपानचा 1-0 असा पराभव केला. मंगळवारी भारताने दक्षिण कोरियाविरोधातील सामना 4-4 असा बरोबरीत सोडला होता. त्यामुळे भारताचे फायनलमधील आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे आज भारत जपानविरोधात कांस्य पदाकासाठी मैदानात उतरला होता. जपानविरोधात बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने 1-0 च्या फरकाने मात मारत कांस्य पदकावर नाव कोरलेय.
हॉकी आशिया कपमध्ये भारत आणि जपान यांना एकाच गटात ठेवण्यात आले होते. दोन्ही संघामध्ये साखळीमध्ये पहिला सामना झाला होता. तेव्हा भारतीय संघाला 2-5 च्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर सुपर 4 मध्ये भारतीय संघाने 2-1 ने विजय मिळवत पराभवाचा वचपा काढला होता. दोन्ही संघात या स्पर्धेत तिसऱ्यांदा लढत झाली.. यामध्ये भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवला. यासह या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदाकावर समाधान मानलेय.
सुपर 4 मध्ये भारतीय संघाने जपानचा पराभव केला होता. त्यामुळे कांस्य पदाकाच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. भारतीय संघाने मनोबल शिखरावर होते. पहिल्या सहा मिनिटांतच भारतीय संघाने गोल करत आघाडी घेतली होती. भारतीय संघाने अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. राजकुमारने जापानविरोधात पहिला आणि एकमेव गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली.. भारतीय संघाने पहिल्या कॉर्टरच्या अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.
Indian men's hockey team claims bronze medal in Asia Cup at Jakarta, Indonesia
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2022
दूसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाच्या मनजीतने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्याला रेफरीने ग्रीन कार्ड दिले. याचा फायदा जपानला घेता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही जपानला गोल करता आला नाही. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरच्या खेळातही एकही गोल झाला नाही. भारताने हा सामना 1-0 च्या फरकाने जिंकला. यासह या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदकावर नाव कोरले.
हॉकी आशिया स्पर्धेत भारतीय संघातील सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला होता. अनेक ज्युनिअर खेळाडूंना संघात स्था दिले होते. भारताच्या नवख्या संघाने आशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली.