एक्स्प्लोर

अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे पदावरुन पायउतार झाले आहेत. पद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. अनिल कुंबळे यांनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनामा देताना त्यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. काय आहे कुंबळेंचं पत्र?

मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्याबाबत मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अभिमान वाटला.

गेल्या एक वर्षात संघाने जी कामगिरी केली आहे,

त्याचं श्रेय कर्णधार, संघ, प्रशिक्षक आणि सर्व सपोर्टिंग स्टाफला जातं.

मात्र माझी काम करण्याची शैली आणि कार्यकाळ वाढवण्याबाबत कर्णधाराला आक्षेप असल्याचं बीसीसीआयकडून कळवण्यात आलं.

कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील मर्यादांचा मी नेहमी आदर केला असताना हे ऐकून मलाही आश्चर्य वाटलं.

कर्णधार आणि माझ्यातील गैरसमज दूर करण्याचा बीसीसीआयने प्रयत्नही केला.

मात्र त्यातून काहीही तोडगा निघाला नाही.

त्यामुळे पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय मी घेतला.

व्यवसायिकपणा, शिस्त, वचन, प्रामाणिकपणा, पूरक कौशल्य आणि अपेक्षित दृष्टीकोन हे माझ्या कामाचं सूत्र होतं.

चांगल्या कामगिरीसाठी या गोष्टी आवश्यकच आहेत.

प्रशिक्षकाची जबाबदारी ही समोर आरसा धरून उभा राहणाऱ्यासारखी असते.

संघाला पाहिजे, तसा बदल प्रशिक्षकाने करायचा असतो, हे मी देखील पाहिलेलं आहे.

हे सर्व पाहता या जबाबदारीतून मुक्त होण्याचा मार्ग मी निवडला.

गेल्या एक वर्षापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना आनंद वाटला.

त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती, बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासनाचे आभार मानतो.

भारतीय क्रिकेटच्या असंख्य चाहत्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो.

भारतीय क्रिकेटचा मी नेहमी हितचिंतक राहिन.

https://twitter.com/anilkumble1074/status/877218428318351361

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget