Sakshi Malik : साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकताच अमिताभ बच्चन म्हणाले होते, माझ्यासाठी ते 1000 सुवर्णपदकांपेक्षा मौल्यवान, ट्विट व्हायरल
Sakshi Malik : साक्षी मलिकनं पदक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. कुस्तीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी चौथी महिला आहे.
Sakshi Malik : भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये12व्या दिवशी कांस्यपदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली होती. अवघा देश आनंदात बेभान झाला होता. तीच साक्षी मलिक कुस्तीला रामराम ठोकून न्यायासाठी उभी असताना एकटी पडली आहे. गल्ली ते दिल्ली 11 महिने व्यवस्थेशी कुस्ती करूनही व्यवस्थेत लैंगिक अत्याचाराविरोधात न्याय मिळत नसल्याने तिने आपलं शूज टेबलवर सोडून कुस्ती सोडत असल्याचे जाहीर केले.
ज्यावेळी तिनं देशाची मान उंचावली होती तेव्हा बाॅलिवूडमध्ये प्रेमाचे भरते आले होते. मात्र, ती आज न्यायासाठी उभी असताना अपवाद सोडल्यास कोणी समोर आलेलं नाही. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना एकटे पडल्याची भावना मनोमन जाणवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बाॅलिवूडमधील दिग्गजांची ट्विट आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांचंही त्यावेळी साक्षीसाठी केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे. ती आज रस्त्यावर रडत असताना ते का शांत आहेत? असाही प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात आहे.
T 2352 -"मालिक" तू "साक्षी" है कि हमारे देश में महिलाओं की शक्ति प्रबल है ... उनका आदर सम्मान और उनकी रक्षा करना प्रत्येक नागरिक का फर्ज है
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 18, 2016
काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?
साक्षीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये12व्या दिवशी पदक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. माझ्यासाठी ते 1000 सुवर्णपदकांपेक्षा मौल्यवान आहे आणि ते सुद्धा पुरेसं नाही. साक्षीसाठी अभिमान आहे, ती भारतीय आणि स्त्री असल्याचा अभिमान आहे. साक्षी मलिकने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. पाच खडतर सामने खेळून साक्षीने 58 किलो गटात पदक जिंकले होते. साक्षीने कुस्तीत पदक जिंकून इतिहास रचला होता. कुस्तीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी चौथी महिला आहे.
For me it is worth a 1000 golds and even that is not enough. Pride for Sakshi, proud that she is Indian and a woman https://t.co/io5JyaMTUP
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 18, 2016
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर बॉलिवूड स्टार्सनीही साक्षी मलिकाचे अभिनंदन केले होते. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी हा भारतीय महिलांचा विजय असल्याचे म्हटले आहे. अमिताभ बच्चनसोबतच करण जोहरनेही साक्षीला भविष्याची आशा म्हटले होते. करण जोहरने ट्विट केले की तो अमेरिकेत हा सामना पाहत आहे. आमिर खानने सुद्धा साक्षीचे अभिनंदन केले होते. आमिर खानने साक्षीचे 16 सामने पाहिले होते. अभिनेता रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, आयुष्मान खुराना, नेहा धुपिया आणि सिद्धार्थ यांनीही साक्षीचे अभिनंदन केले होते.