एक्स्प्लोर
दिल्लीचा सुमीतकुमार 'हिंदकेसरी'चा मानकरी, अभिजीत कटकेला उपविजेतेपद
पुणे : दिल्लीच्या छत्रसाल आखाड्याचा पैलवान सुमितकुमार 2017 सालचा हिंदकेसरी ठरला आहे. सुमितकुमारनं हिंदकेसरी किताबाच्या निर्णायक कुस्तीत महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेवर 9-2 अशी मात केली. त्यामुळं अभिजीतला महाराष्ट्र केसरीपाठोपाठ यंदा हिंदकेसरी कुस्तीतही उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. पण वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीच्याही फायनलमध्ये मारलेली धडक ही त्याच्या उज्ज्वल भवितव्याची खात्री देत आहे.
पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं यंदा हिंदकेसरी स्पर्धेचं आयोजन सारसाबागेतल्या सणस मैदानात करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही सुमितनं अभिजीतला हरवलं होतं. मात्र त्या पराभवानं खचून न जाता अभिजीतनं परतीच्या लढतीत आक्रमक खेळ केला आणि क्रिशनकुमारला 8-3 असं हरवून फायनल गाठली होती. फायनलमध्ये सुमितनं त्याच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवलं.
महाराष्ट्राचा पैलवान अभिजीत कटकेनं हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेची फायनल गाठली होती. परतीच्या उपांत्य सामन्यात अभिजीतनं क्रिशन कुमारला 8-2 असं हरवलं. किताबाच्या लढतीत अभिजीतला सुमितचा सामना करायचा होता. य़ाआधी सुमितनंच पहिल्या उपांत्य सामन्यात अभिजीतला हरवलं होतं.
अभिजीत कटके हा मूळचा पुण्याचा असून, यंदा महाराष्ट्र केसरीत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. आता हिंदकेसरी स्पर्धेतील कामगिरीनं ते अपय़श धुवून काढण्याचा अभिजीतचा प्रयत्न राहील. परतीच्या उपांत्य लढतीत अभिजीतचा प्रतिस्पर्धी क्रिशननं पहिल्या उपांत्य सामन्यात जोगिंदरवर मात केली होती. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं सारसबागेतील सणस मैदानात हिंदकेसरी स्पर्धा भरवण्यात आली असून, या स्पर्धेला इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यताही आहे.
महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेनं हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला होता. अभिजीत कटकेनं नासिरला हरवून उपांत्य फेरीत धडक मारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement