एक्स्प्लोर

37th National Games 2023 :  महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक

37th National Games 2023 : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला.

37th National Games 2023 : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. मंगळवारी उपांत्य सामन्यात महाराष्ट्र महिला संघाची उपांत्य फेरीत ब-गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कर्नाटकशी गाठ पडणार आहे. फोंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटातील तीन्ही सामने जिंकत महाराष्ट्र महिला संघाने गटात अव्वल स्थान कायम राखले. 

पुरुष गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ४८-२४ असा २४ गुणांनी पराभव करत गटात प्रथम स्थान राखले. महाराष्ट्राकडून प्रियांका भोपिने ३.४० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. पूजा फरगडेने आक्रमणाची चमक दाखवत १० गुण मिळवले. किरण शिंदेने २.३० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. संपदा मोरेने २.०० मि. संरक्षण करत ६ गुण मिळवले. गुजरात संघाकडून किरण १.२० मि. आणि १.१० मि. संरक्षण केले. तर गोपीने १.३०, १.२० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले.

महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि ब गटात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या ओडीसाचा अ गटात दुसऱ्या क्रमांकावरील केरळ बरोबर उपांत्य फेरीचे सामने होणार आहे. आज झालेल्या महिला गटातील अन्य सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा ५२-४० असा २२ गुणांनी तर केरळने गोव्याचा १२०-१२ असा १०८ गुणांनी पराभव केला.

पुरुष गटात महाराष्ट्राने शेवटच्या साखळी सामन्यात आंध्र प्रदेशवर ७४-३२ असा ४२ गुणांनी सहज विजय मिळवला असला तरी सामन्याला प्रारंभ जोशात झाला. प्रथम आक्रमण करणाऱ्या आंध्र प्रदेशने १६ मिळवण्यात यश मिळवले. यामुळे सामना चुरशीचा होईल असे वाटत होते. मात्र महाराष्ट्रने धारदार आक्रमण करीत आंध्रचे २६ गुणांची कमाई करताना सामना एकतर्फी केला. फैजन पठाणने १.१० मि. संरक्षण करत १६ गुणांची नोंद केली, त्याला साथ देत रामजी कश्यपने १.१०, १.०५ मि. संरक्षण करताना १२ गुण मिळवले. ऋषिकेश मुरचवडेने ८ गुण मिळवले तर अक्षय मासाळने १.२० मि. संरक्षण करताना ६ गुण वसूल केले. आंध्रप्रदेशकडून पी. नरसय्याने १.०० मि. संरक्षण करीत ६ गुण मिळवले. सिवा रेड्डीने १.२० मि. संरक्षणचा खेळ करत आक्रमणात ६ गुण मिळवले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget