एक्स्प्लोर
US OPEN : 19 वर्षांच्या नाओमीने अँजेलिक कर्बरला हरवलं
गतविजेत्या अँजेलिक कर्बरचं अमेरिकन ओपनमधलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे.
![US OPEN : 19 वर्षांच्या नाओमीने अँजेलिक कर्बरला हरवलं 19 Year Old Naomi Osaka Beats Angelique Kerber 63 61 To Reach The Second Round US OPEN : 19 वर्षांच्या नाओमीने अँजेलिक कर्बरला हरवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/30132420/Angelique-Kerber%E2%80%8F-Naomi-Osaka.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गतविजेत्या अँजेलिक कर्बरचं अमेरिकन ओपनमधलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे.
जपानच्या 19 वर्षांच्या नाओमी ओसाकानं कर्बरचा 6-3, 6-1 असा धुव्वा उडवून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला महिला एकेरीत सहावं मानांकन देण्यात आलं होतं. नाओमीनं कर्बरसारख्या 'टॉप टेन'मधल्या खेळाडूवर मात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महिला एकेरीतल्या गतविजेत्या खेळाडूला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावं लागण्याची गेल्या तेरा वर्षांमधली ही पहिली वेळ आहे. 2005 साली स्वेतलाना कुझनेत्सोव्हा ही आदल्या वर्षीची विजेती पहिल्याच फेरीत हरली होती.
![US OPEN : 19 वर्षांच्या नाओमीने अँजेलिक कर्बरला हरवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/30131828/Naomi-Osaka-580x395.jpg)
![US OPEN : 19 वर्षांच्या नाओमीने अँजेलिक कर्बरला हरवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/30131826/Angelique-Kerber%E2%80%8F-431x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)