या शिवाय crowdsource सारख्या वेबसाईटवरुन http://atmsearch.in/ या साईटला भेट देऊन तुम्ही एटीएम सेंटरचा शोध घेऊ शकता.
2/5
फेसबुक आणि ट्विटरवर #WorkingATM, #ATMsWithCash आणि #ATMsNearYou या हॅशटॅगवरुन जिथे एटीएम सेंटर सुरु आहे, त्याची माहिती दिली जात आहे.
3/5
त्यामुळे पैसे असलेल्या एटीएम सेंटरचा शोध ही सर्वांचीच समस्या आहे. तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी आता तुम्ही इंटरनेटचा आधार घेऊ शकता. कारण सध्या सोशल मीडियावरील फेसबुक आणि ट्विटरवर असे अनेक हॅशटॅग उपलब्ध आहेत. ज्या माध्यमातून एटीएम सुरु असलेल्या ठिकाणांची माहिती दिली जात आहे.
4/5
लोकांच्या गर्दीमुळे अनेक एटीएममधील पैसे संपले आहेत. त्यामुळे त्यांना ज्या एटीएम सेंटरमध्ये कॅश उपलब्ध आहे, त्यांचा शोध घेताना मोठी मेहनत करावी लागत आहे. सध्या तर अनेक ठिकाणी तर एटीएम सेंटरवरील गर्दीमुळे एटीएमचे सर्व्हर काम करणे बंद झाले आहे.
5/5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली. या घोषणेनंतर गेल्या सहा दिवसांपासून विविध बँकांच्या एटीएम सेंटर बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.