तसेच तुम्ही ज्या भांड्यात पाणी साठवता, ते भांडे दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुऊनच त्यात पाणी भरावे. कारण अनेकदा पिण्याच्या साठवलेल्या पाण्यातही रोगजंतु जमा होतात.
2/7
जर तुम्ही पावसाऴ्यात दूरच्या प्रवासाला निघाला असाल, तर पाण्याला प्यूरिफाय करणाऱ्या टॅबलेटस वापरावे. किंवा शुद्ध पाण्यासाठी पोर्टबल फिल्टर ठेवावा. कारण पावसाळ्यात 90% आजार हे दुषित पाण्यामुळेच प्रसारित होतात.
3/7
विशेष करून रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळावे, तसेच या दिवसात स्वत:ची पाणी बॉटल ठेवावी.
4/7
तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसातील छपरावरील पाण्याची टाक्या झाकून ठेवा. तसेच या दिवसात बाहेर पाणी पिणे देखील टाळावे.
5/7
त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत शुद्ध पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्यूरिफायर आणि वॉटर फिल्टरची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. त्यामुळे यात अशुद्ध पाणी जमा होऊन ते खराब होऊ नयेत. तसेच तुम्हाला शुद्ध पाणीपुरवठा सतत चालू राहिल.
6/7
पावसाळ्याच्या दिवसांत नाले आणि गटारी ओव्हरफ्लो झाल्याने तुम्हाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो.
7/7
पावसाळ्यात तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. याकाळात संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही मोठे असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी डॉक्टर शिखा शर्मा यांनी काही टिप्स दिल्या आहेत.