महाबळेश्वर( महाराष्ट्र): सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांसाठी पर्वणी ठरु शकतं. महाबळेश्वरच्या जवळच पाचगणी हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
2/10
अंबोली( महाराष्ट्र): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली हे हिल स्टेशन महाराष्ट्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. येथील वनराई, धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
3/10
माऊंट अबू (राजस्थान): अरवली पर्वतरांगांमधील माऊंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. माऊंट अबू येथील नद्या, धबधबे आणि प्रसिद्ध लेण्यांचं वातावरण पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
4/10
गोवाः पर्यटन म्हटल्यानंतर सर्वात पहिला पर्याय हा नेहमी गोवा हाच येतो. गोव्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
5/10
गंगटोक (सिक्कीम): गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. हिमालयीन पर्वतरांगांमध्ये ट्रेकिंगसाठी गंगटोकची खास ओळख आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
6/10
धरमशाळा (हिमाचल प्रदेश): धरमशाळा हे हिमाचल प्रदेशातील दाट वनांनी वेढलेलं शहर आहे. जून महिन्यात येथील दाल लेणी, भागसुनग धबधबा ट्रुईंड हिल ही ठिकाणं पाहण्यासारखी असतात.( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
7/10
कुर्ग (कर्नाटक): कर्नाटक राज्यातील कुर्ग जिल्हा हे पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. कुर्गमध्ये नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद घेता येतो. येथील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात.( फोटो सौजन्यः कुर्ग अधिकृत संकेतस्थळ)
8/10
नैनिताल (उत्तराखंड): नैनितालचं निसर्ग सौंदर्य जग प्रसिद्ध आहे. या सौंदर्यामध्ये पावसाळ्यात अजूनच भर पडते. येथील हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
9/10
औली (उत्तराखंड): उत्तराखंडमधील औली हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. स्की डेस्टिनेशन अशी याची ओळख आहे. मान्सूनमध्ये पर्यटक येथील स्नोफॉलचा आनंद घेऊ शकतात. औली हे ठिकाण समुद्रसपाटीपासून अडीच हजार मीटर उंचीवर आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)
10/10
अलेप्पी(केरळ): भारतात मान्सनूचं पहिलं आगमन होतं ते केरळमध्ये. केरळचे किनारे पहिल्या पावसानंतर निसर्गाच्या सौंदर्याने नटतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची ओढ केरळकडे जास्त असते. अलेप्पी हे ठिकाण सांस्कृतिक, नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ( फोटो सौजन्यः विकिपीडिया)