उगवत्या सूर्याचा देश अशी ओळख असणाऱ्या जपानकडे 765 टन सोनं आहे. जपानचा जगात सर्वाधिक सोनं असणाऱ्यांच्या यादीत आठवा क्रमांक लागतो.
2/11
नेदरलँड हा देश या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. नेदरलँडकडे 612 टन सोनं आहे.
3/11
जगात सर्वाधिक सोनं असणाऱ्या 10 देशांच्या यादीत भारताचाही क्रमांक लागतो. या यादीत भारताचा दहावा क्रमांक असून भारताकडं 557 टन एवढं सोनं आहे.
4/11
जागतिक महासत्ता असलेला अमेरिका देश सर्वाधिक सोनं ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा बाजी मारतो. अमेरिकेकडे 8133 टन सोनं आहे. एवढं सोनं असणारा अमेरिका हा देशातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे.
5/11
सर्वाधिक सोनं असलेला जर्मनी हा जगात दुसरा देश आहे, ज्याच्याकडे 3384 टन सोनं आहे.
6/11
इटलीकडे 2452 टन सोनं आहे. इटली सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
7/11
फ्रान्सकडे 2436 टन सोनं असून चौथा क्रमांक लागतो.
8/11
जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनचा सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांच्या यादीत पाचवा क्रमांक लागतो. चीनकडे 1797 टन सोनं आहे.
9/11
रशिया या देशाकडे 1460 टन सोनं आहे. रुसचा या यादीत सहावा क्रमांक लागतो.
10/11
स्वित्झर्लंडकडे 1040 टन सोनं आहे. ज्यामुळे स्वित्झर्लंडचा या 10 देशांच्या यादीत सातवा क्रमांक लागतो.
11/11
दिवाळी असो की दसरा, एकही सण असा नाही ज्याला सोन्याची खरेदी केली जात नाही. भारतीय संस्कृतीमध्ये लग्नासारख्या उत्सवांमध्ये सोन्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्याकडं सर्वाधिक सोनं आहे. भारताचंही या देशांच्या यादीत स्थान आहे.