टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस.धोनीच्या जीवनावर आधारीत ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा 30 सप्टेंबर रिलीज होत आहे. पण या सिनेमासाठी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने बरीच मेहनत घेतली. त्यासाठी त्याने भारताचे माजी क्रिकेटर किरण मोरे यांच्या अकादमीत क्रिकेटचे धडेही गिरवले.
2/10
सुशांतसिंह रोज नेटमध्ये 400 चेंडूंचा सामना करायचा.
3/10
सुशांत दररोज 700 हून अधिक हूक आणि हेलिकॉप्टर शॉट्स खेळायचा
4/10
धोनीप्रमाणेच सुशांतसिंह आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असे
5/10
विकेटकिंपिंग शिकण्यासाठी सुशांतसिंहला बरेच परिश्रम करावे लागले असंही मोरे म्हणाले
6/10
छोट्या शहरातील एका मुलाने क्रीडाजगतावर राज्य करण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. सुशांतसिंह राजपूत याने आपल्या अभिनयाने खराखुरा धोनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.
7/10
विशेष म्हणजे, तमिळ आणि तेलगू भाषिक राज्यातील सर्वाधिक चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज होणारा हा पहिला चित्रपट आहे
8/10
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा संपूर्ण जगात एकाच दिवशी रिलीज होतो आहे.
9/10
या भूमिकेसाठी सुशांतनं बरीच मेहनत घेतली. त्याला नेटमध्ये जे काही करायला सांगितलं त्यासाठी तो नेहमीच तयार असायचा असंही मोरे म्हणाले
10/10
नेटमध्ये सुशांत काय काय करतो याचं व्हिडिओ शूट केलं जात होतं त्यामुळे त्याला काय बदल करायचे आहेत ते समजायचं