एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर भारताच्या नावावर 'हे' 7 विक्रम
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28125334/virat-kohli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28125334/virat-kohli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
2/8
![साल 2000 नंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी एका सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28125020/rahane-umesh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साल 2000 नंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी एका सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती.
3/8
![सलामीवीर केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत सहा अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा राहुल पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मुरली विजयने 2014-15 मध्ये केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28125017/vijay-rahul.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलामीवीर केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत सहा अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा राहुल पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मुरली विजयने 2014-15 मध्ये केला होता.
4/8
![भारताने मायदेशात खेळलेल्या या मोसमातील 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवला. पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28125014/team-india2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने मायदेशात खेळलेल्या या मोसमातील 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवला. पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.
5/8
![धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. या विजयासोबत भारताने अनेक विक्रमही नोंदवले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/25200407/R-Ashwin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. या विजयासोबत भारताने अनेक विक्रमही नोंदवले आहेत.
6/8
![मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव होऊनही मालिका जिंकण्याचा विक्रम चौथ्यांदा केला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/03180226/Virat-Team.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव होऊनही मालिका जिंकण्याचा विक्रम चौथ्यांदा केला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.
7/8
![फिरकीपटू आर. अश्विनने 2016-17 या मोसमात सर्वाधिक 79 विकेट घेण्याचा विक्रम केला. एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन पहिलाच गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनच्या 2007-08 साली घेतलेल्या 78 विकेटचा विक्रम मोडीत काढला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/25020308/Ashwin1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिरकीपटू आर. अश्विनने 2016-17 या मोसमात सर्वाधिक 79 विकेट घेण्याचा विक्रम केला. एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन पहिलाच गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनच्या 2007-08 साली घेतलेल्या 78 विकेटचा विक्रम मोडीत काढला.
8/8
![चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच भारतीय मैदानात शून्यावर बाद झाला. यापूर्वी परदेशात खेळलेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये तो दोन वेळा शून्यावर बाद झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/05024248/pujara-out-sad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच भारतीय मैदानात शून्यावर बाद झाला. यापूर्वी परदेशात खेळलेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये तो दोन वेळा शून्यावर बाद झाला होता.
Published at : 28 Mar 2017 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)