टीम इंडियात कमी काळासाठी निवड आणि जास्त वेळ बाहेर, असंच काहीसं उनाडकटबाबत घडत होतं. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत राहिला. आयपीएलमध्ये तर त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचाच फायदा उनाडकटला झाला. पुन्हा एकदा जयदेवची भारताच्या संघात निवड करण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने जबरदस्त गोलंदाजी करुन, मालिकावीराचा मान मिळवला.
2/5
जयदेवने 3 सामन्यांत 9 षटकं गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 44 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 4.88 होता. या मालिकेतून जयदेव प्रकाश झोतात आला असला, तरी त्याने 7 वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं. मात्र करिअरच्या चढउतारामुळे जयदेव चमक दाखवू शकला नव्हता.
3/5
पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात त्याने 4 षटकात 43 धावा दिल्या. या दौऱ्यातील एकमेव टी ट्वेण्टी सामना टीम इंडियाने गमावला. त्याचा फटका जयदेवला बसला, त्याला संघातून वगळण्यात आलं.
4/5
जयदेवने डिसेंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. यानंतर तब्बल तीन वर्षांनी उनाडकटची पुन्हा भारतीय संघात निवड झाली. 2013 मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर होता, त्या संघात उनाडकटला संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्याने 7 वन डे सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या. मग पुन्हा उनाडकटला डावलण्यात आलं. पुन्हा तीन वर्षांनी जून 2016 मध्ये तो परत झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 संघात निवडला गेला.
5/5
श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत भारताचा युवा गोलंदाज जयदेव उनाडकट मालिकावीराचा मानकरी ठरला. जयदेवने यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांच्यापेक्षा कमी विकेट घेतल्या. मात्र त्याची सरासरी चांगली होती.