जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केल्यामुळं सध्या श्रीकांत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत त्यांच्या ‘लो प्रोफाइल’ आणि ‘दबंग’ कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेला हा आगळावेगळा सन्मान लोकांशी अधिक जवळीक साधेल, एवढं नक्की!
2/5
अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 33 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 33 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द कलेक्टर ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत गाडी चालवत आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर दिगंबर ठक ऐटीत मागे बसलेत, असं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं.
3/5
लाल दिवा असलेली चांदीची गाडी त्यांना भेट म्हणून देण्यात आली. आयुष्यभर आपल्या साहेबांना इच्छितस्थळी सुखरुप पोहोचविणारे दिगंबर, हे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या सन्मानाने गहिवरून गेले आहेत. ड्रायव्हरकडे आपल्या समाजात तितकासा मान नाही. अशात ड्रायव्हर म्हणून रिटायर होताना जिल्हाधिकाऱ्यांकडून रॉयल ट्रीटमेन्ट मिळाली, तर कुणाला आवडणार नाही?
4/5
आपल्या शासकीय निवास्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयालापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दिगंबर यांना आपल्या जागेवर बसविले. यावेळी झालेल्या सेवानिवृत्ती समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कुटुंबीयांसह सन्मानित केलं.
5/5
कालचा दिवस ठक यांच्या आयुष्यत अतिशय महत्वाचा ठरला. आनंद, दुखः आणि सन्मान अन अभिमानाचाही.. 33 वर्ष जिल्हाधिकाऱ्यांचे वाहनचालक म्हणून सेवा देणारे आणि अकोल्याच्या तब्बल 18 जिल्हाधिकाऱ्यांचे ‘सारथ्य’ करणारे दिगंबर काल सेवानिवृत्त झाले. ठक यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं. त्यांनी स्वत: ठक यांचं सारथ्य करण्याचा निर्णय घेतला.