एक्स्प्लोर
Coronavirus : 'गेट वे ऑफ इंडियावर' बोलता ड्रोन, जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

1/5

विशेषतः मुंबईत गणेश विसर्जनाला या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली.
2/5

सध्या मुंबई पोलीसंकडे असे तीन ड्रोन आहेत. वर्दळीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास करडी नजर ठेवण्यासोबतच लोकांना सूचना देण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.
3/5

मुंबईत पर्यटन स्थळांवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी आता मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया' परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका विशेष ऑडिओ म्हणजेच बोलत्या ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
4/5

सध्या जरी या ड्रोनमधून कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात येत असली तरी भविष्यात या ऑडिओ ड्रोनचं हे उपकरण विविध ठिकाणी सूचना देण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
5/5

लोकांवर नजर ठेवण्यासोबतच या ड्रोनमध्ये असलेल्या स्पीकरमधून कोरोनाबाबत काय दक्षता घ्यावी याच्या सूचनाही केल्या जात आहेत. त्यामुळे दुहेरी हेतू साध्य करण्याऱ्या या बोलत्या ड्रोनबाबत पर्यटकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते.
Published at : 18 Mar 2020 07:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
