एक्स्प्लोर
शिवनेरी, अश्वमेध, शिवशाहीनंतर आता ‘नॉन एसी स्लीपर बस’

1/7

2/7

लाल परी म्हणून ओळख असलेली एसटी आता काळानुरुप बदलत आहे.
3/7

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस सेवेनंतर लवकरच विनावातानुकूलित शयनयान बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
4/7

एसटीच्या रातराणी बसला जितकं भाडं प्रवाशांना द्यावं लागतं तितकंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त भाडं एसटीच्या या नव्या विनावातानुकूलित शयनयान बससाठी आकारलं जाऊ शकतं. मात्र या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
5/7

टू बाय वन, 30 शयन कोच असणारी ही बस पुण्यातील सीआयआरटी या संस्थेकडून प्रमाणित करुन त्यानुसार बांधणी सुरु आहे. लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या विनावातानुकूलित शयनयान बससाठी एसटीचेच चालक, वाहक असतील, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
6/7

पुण्यातील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलित शयनयान असलेल्या बसच्या (नॉन एसी स्लीपर कोच बस) निर्मितीचं काम सुरु आहे. येत्या वर्षभरात साधारण एक हजार विना वातानुकूलित शयनयान बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.
7/7

शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही नंतर बस आता एसटी महामंडळ ताफ्यात विनावातानुकूलित ‘शयनयान’ दाखल होत आहे. प्रवाशांना रात्री लांब पल्ल्याचा प्रवास झोपून करता यावा यासाठी एसटी महामंडळ ही बस आणत आहे.
Published at : 12 Jul 2018 10:18 AM (IST)
Tags :
Msrtcअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
रायगड
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
