एक्स्प्लोर
दुबईतल्या 'त्या' रात्रीचा प्रत्येक क्षण बोनी कपूर यांच्याच शब्दात...
1/8

बोनी यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला, जो मुळात आतून बंद केलेला नव्हता. बाथटब पूर्णपणे पाण्याने भरला होता आणि त्यामध्ये श्रीदेवी पूर्णपणे बुडाली होती. बोनी यांनी जे पाहिलं ते सत्य आहे हे मानण्यासाठी ते तयार नव्हते. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... तशा अवस्थेत श्रीदेवीला पाहून बोनी कपूर यांच्यावर जी परिस्थिती ओढावली असेल, त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. श्रीदेवी समोर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होती. बोनी कपूर यांचं सर्वस्व हरवलं होतं. दोन तासांपूर्वीच बोनी कपूर पत्नीला सरप्राईज देण्यासाठी आले होते, ते एका वाईट स्वप्नामध्ये बदललं होतं. श्रीदेवी.. जी डिनरसाठी तयार होत होती, काळाने असा घाला घातला की ही तयारी अंतिम संस्कारांमध्ये बदलली...
2/8

बोनी कपूर आणि श्रीदेवीने सुमारे अर्धा तास गप्पा मारल्या. त्यानंतर बोनी कपूरने श्रीदेवीला शॉपिंगचा प्लॅन पुढे ढकलण्यास सांगितलं आणि डिनरसाठी जाण्याबाबत विचारलं. शिवाय, श्रीदेवीला तयार होण्यासही सांगितलं. बोनी कपूर यांनी सांगितलं की, “मी लिव्हिंग रुममध्ये आलो आणि श्रीदेवी आंघोळीसाठी निघून गेली.” त्यानंतर बोनी कपूर यांनी टीव्ही पाहण्यास सुरुवात केली. काही चॅनेल बदलल्यानंतर भारत वि. दक्षिण आफ्रिका मॅच पाहत होते. यानंतर पाकिस्तान सुपरलीगच्या हायलाईट्स पाहिल्या. मात्र बोनी कपूरना लक्षात आले की, आज शनिवार असल्याने रेस्ट्राँमध्ये गर्दी असेल. त्यामुळे लवकर जायला हवं. त्यावेळी साधारण रात्रीचे 8 वाजले असतील. बराच वेळ झाला होता, त्यामुळे बोनी कपूर यांनी लिव्हिंग रूममधून दोन वेळा मोठ्याने श्रीदेवीला आवाज दिला. टीव्हीचा आवाजही कमी केला, मात्र कोणतंही उत्तर आलं नाही. त्यानंतर ते बेड रूममध्ये गेले, तिथे त्यांना पाण्याचा आवाज येत होता. त्या नंतरही बोनी यांनी "जान... जान..." अशा हाका मारल्या मात्र कोणतंही उत्तर आलं नाही, हे विचित्र होतं.
Published at : 05 Mar 2018 09:53 PM (IST)
View More























