एक्स्प्लोर
एका ट्वीटमधून रोनाल्डोची 6 कोटींची कमाई, कोहली किती कमावतो?

1/6

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर पाच कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एवढे फॉलोअर्स असलेला तो पहिला भारतीय आहे. विराट कोहली जगातील सर्वात व्हॅल्यूएबल क्रिकेटर आहे. पण ब्रॅण्ड व्हॅल्यू ऑन ट्विटर (प्रति ट्वीट कमाईच्या बाबतीत) तो क्रीडाविश्वात पाचव्या क्रमांकावर आहे. जाणून घेऊया विराटची कमाई किती आहे आणि टॉप-5 मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे?
2/6

विराट कोहली : मागील वर्षी कमाई आणि ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या बाबतीत भारतीय सेलिब्रिटींमध्ये अव्वल ठरलेला विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. तो एका ट्वीटमधून 2.5 कोटी रुपये (350,101 यूएस डॉलर) कमावतो.
3/6

नेमार ज्युनियर : ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर ज्युनियर नेमार एका ट्वीटसाठी 3.5 कोटी रुपये (478,138 यूएस डॉलर) घेतो. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4/6

लेब्रोन जेम्स : चौथं नाव फुटबॉल नाही तर बास्केटबॉल विश्वातून आहे. अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स एका ट्वीटसाठी 3.4 कोटी रुपये (470,356 यूएस डॉलर) घेतो.
5/6

ख्रिस्तियानो रोनाल्डो : सोशल मीडिया मार्केटिंग फर्म Opendorse च्या अहवालानुसार, एका ट्वीटमधून होणाऱ्या कमाईच्या बाबतीत दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. पोर्तुगालच्या या जादूगार स्ट्रायकरला एका ट्वीटसाठी 6.2 कोटी रुपये (868,604 यूएस डॉलर) मिळतात.
6/6

आंद्रेस इनिएस्ता : स्पॅनिश फुटबॉलपटू आंद्रेस इनिएस्ता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचं एक ट्वीट 4.3 कोटी रुपये (590,825 यूएस डॉलर) एवढं महाग आहे. आंद्रेस हा सेंट्रल मिडफील्डर आहे आणि तो विसेल कोबे या फुटबॉल क्लबकडून खेळतो.
Published at : 26 Feb 2020 02:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
राजकारण
विश्व
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion