एटीएम कार्डचा तपशील हॅक करण्यासाठी आरोपींकडून हायटेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करण्यात आला.
2/7
जवळपास 20 लोकांनी खात्यातून पैसे चोरी गेल्याची तक्रार केली आहे. हा एकूण आकडा अडीच लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
3/7
केरळ पोलिसांनी हॉटेलमधून तिघांचे फोटो मिळवले असून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. देशभरातील पोलिस स्टेशन्समध्ये उर्वरित दोघांचे फोटो पाठवण्यात आले आहेत.
4/7
तिघेही आरोपी रोमानियाचे असून ते पर्यटनासाठी 25 जून रोजी भारतात आले आहेत. केरळमध्ये हे आरोपी 8 जुलै रोजी आले. ते तिरुवअनंतपुरममधील हॉटेलमध्ये थांबले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
5/7
तिन्ही आरोपींनी एटीएम फोडण्यासाठी हायटेक उपकरणाचा वापर केला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
6/7
केरळ पोलिसांनी एटीएम दरोड्याच्या संशयावरुन एकाला अटक केली. या दरोड्यात तिघांचा समावेश आहे.
7/7
रोमानियन नागरिकाने केरळमधील एटीएमवर दरोडा टाकत विविध खात्यांतून अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या आरोपीला नवी मुंबईत अटक करण्यात आली आहे.