मी आत्ताच निवृत्ती घेणार नाही. पुढच्या आयपीएलसाठी अजून एक वर्ष बाकी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट सिजन चांगलं गेल्यास मी पुढच्या आयपीएलमध्येही खेळेन. तुमच्यामध्ये धावांची भूक असेल, तर तुम्ही खेळत रहायला हवं, कारण, वय हा एक आकडा आहे, असंही गंभीर म्हणाला.
2/9
कर्णधारपद सोडल्यानंतर न खेळण्याचा निर्णय गंभीरने स्वतः घेतला होता, असं पाँटिंग म्हणाले.
3/9
दरम्यान, गंभीरने ही माहिती दिल्यानंतर टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं.
4/9
‘संघ निवडीसाठी मी कधीही नकार दिला नाही. असं असतं तर मी कर्णधारपद सोडण्यासोबतच निवृत्तीचीही घोषणा केली असती. मात्र माझ्यात अजून बरंच क्रिकेट बाकी आहे’, असं गंभीरने सांगितलं.
5/9
माझ्या नेतृत्त्वात दिल्लीला सलग पराभव स्वीकारावे लागले. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत मी राजीनामा दिला. मात्र खेळण्यासाठी कधीही नकार दिला नाही आणि हे संघ व्यवस्थापनासोबतच रिकी पाँटिंगलाही माहित आहे, असं गंभीरने सांगितलं.
6/9
मात्र एबीपी न्यूजच्या वाह क्रिकेट या कार्यक्रमात गंभीरने पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. आपण कधीही संघ निवडीसाठी नकार दिला नाही, असं तो म्हणाला.
7/9
कर्णधारपद सोडल्यानंतर गौतम गंभीर लवकरच निवृत्ती घेईल, अशी चर्चा होती. मात्र त्याने आपली बाजू मांडली आहे.
8/9
अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी गौतम गंभीरबाबत आपलं मत मांडलं.
9/9
यंदाच्या आयपीएलमध्ये 14 पैकी नऊ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे.