दोन्ही फोनमध्ये आणखी एक नवं फीचर अॅड केलं आहे, ते म्हणजे दोन्ही आयफोन वॉटर आणि डस्ट प्रूफ असतील.
2/12
परंतु भारतीयांना आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लससाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतात 7 ऑक्टोबरला आयफोन 7 लॉन्च होणार असून त्यांची किंमत 60 हजारांपासून सुरु होईल.
3/12
विशेष म्हणजे हे आयफोन 3D टच असून वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नाही. अॅपल इयर पॉड्स लायटनिंग कनेक्टरद्वारे वापरता येऊ शकतं.
4/12
तर आयफोन 7 ची किंमत 749 डॉलर्स म्हणजेच सुमारे 49,700 रुपये आहे. 9 सप्टेंबरपासून दोन्ही आयफोनच्या प्री-ऑर्डरला सुरुवात होईल. यानंतर 16 सप्टेंबरपासून आयफोन ग्राहकांना उपलब्ध होईल.
5/12
आयफोन 7 ची किंमत 649 डॉलर्स (सुमारे 43,100 रुपये) आहे.
6/12
हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आणि अधिक अॅडव्हान्स आयफोन असल्याचं टीम कूक यांनी सांगितलं
7/12
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. एक स्पीकर वर असून दुसरा फोनच्या खाली आहे. यामध्ये रेटिना HD डिसप्ले आहे, जो आधीच्या आयफोनच्या तुलनेत 25 टक्के ब्राईट आहे.
8/12
आश्चर्यकारक बाब म्हणजे सुपर मारिओ हा प्रसिद्ध व्हिडीओ गेम वर्षअखेरीस आयफोनमध्ये उपलब्ध होणार आहे.
9/12
फोनच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या आयफोनची बॉडी ग्लास आणि मेटलपासून बनवली आहे.
10/12
आयफोन 7 मधील फिजिकल होम बटण काढून त्याजागी फोर्स सेन्सिटिव्ह बटण लावलं आहे,
11/12
32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध असणार आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस आणि अॅापल वॉच 2मध्ये 4 GB रॅम देण्यात आला आहे.
12/12
अॅपलचे बहुचर्चित आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लॉन्च झाले आहेत. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या ग्राहम सिव्हिक ऑडिटोरियममधील भव्य सोहळ्यात कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी या फोनचं अनावरण केलं. याशिवाय कंपनीने अॅपल वॉच 2 ही लॉन्च केलं.