त्यामुळे आता कार्तिकी एकादशीनुसार सुरु होणारी लगीनसराई ही या वर्षअखेरपर्यंत चालू राहणार आहे.
3/7
दरम्यान, २०१७ या वर्षातील उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्येही मिळून अद्याप १० विवाह मुहूर्त शिल्लक आहेत.
4/7
या कालावधीतही कुठलाही शुभमुहूर्त नसल्याचं सोमण यांनी सांगितलं आहे. मात्र, काही जण आपल्या वेळ आणि सोयीनुसार मुहूर्त काढून शुभकार्य उरकू शकतात.
5/7
पौष महिन्यात अर्थात नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त असणार नाही. तर अधिक ज्येष्ठ मास येत असून तो 16 मे ते 13 जून दरम्यान आहे.
6/7
यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल 20 ते 22 मुहूर्त कमी आहेत. पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे.
7/7
पुढच्या वर्षी ज्यांचा लग्नाचा प्लॅन आहे, त्यांनी एकतर घाई करा किंवा अजून एखादं वर्ष वाट पाहा. कारण चातुर्मास आणि अधिक मासामुळे तब्बल 4 ते 5 महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत.