तेजस ट्रेन आठवड्याला पाच दिवस धावणार आहे. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत.
2/9
भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस अखेर रुळावर अवतरली आहे.
3/9
4/9
तेजस ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे सोईसुविधा पुरवण्यात आलेल्या असून अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचं स्वप्न तेजसच्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. संपूर्ण ट्रेनवर खास प्रकारचं पॅटर्न छापण्यात आला आहे. तेजस ट्रेनचं भाडं शताब्दी ट्रेनच्या तुलनेत जास्त असेल.
5/9
तेजस ट्रेनच्या निर्मितीसाठी रेल्वेने तब्बल 3 कोटी 25 लाख रुपये खर्च केले आहेत.
6/9
तेजस ट्रेनचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही आहेत.
7/9
तेजस एक्सप्रेसचा पहिला रॅक कपूरथलाच्या रेल्वे कारखान्यात बनवला आहे. तेजस ट्रेनच्या डब्ब्याचं डिझाईन सुरेश प्रभूंना आवडलं. ते म्हणाले की, “तेजस एक्स्प्रेस सर्वात आधी मुंबई आणि गोव्यात धावेल. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनौ आणि दिल्ली-चंदीगडमध्ये चालवण्यात येईल.”
8/9
कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस अगदी आरामदायक आणि जलद असून यामुळे कोकणवासियांचा वेळ वाचवणार आहे. केवळ साडे आठ तासात मुंबई ते गोवा हा पल्ला गाठता येणार आहे. तेजस ट्रेन ताशी 200 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे.