एक्स्प्लोर
हॅप्पी बर्थडे : अविवाहित सलमान खानच्या आजवरच्या गर्लफ्रेंड्स
1/8

ऐश्वर्या राय : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त चर्चा झाली ती सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याची, या दोघांच्या प्रेमाची आणि सलमानने ऐश्वर्यासाठी केलेल्या कारनाम्यांची. या दोघांची लव्ह स्टोरी अनेकदा अनेक वर्तमानपत्रांची हेडलाईन ठरली होती. परंतु या दोघांचे नातेदेखील टिकू शकले नाही.
2/8

जरीन खान : जरीन खान या पाकिस्तानी अभिनेत्रीला सलमाननेच बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. सलमानच्या वीर या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले. कतरिनानंतर सलमान काही महिने जरीनसोबत रीलेशनशीपमध्ये होता.
3/8

सोमी अली : कराचीत जन्मलेली सोमी अली या मॉडेलचे सलमानवर खूप प्रेम होते. सलमानला भेटण्यासाठी ती मुंबईत आली. इथे तिने मॉडेलिंगही केले. दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत अशा खूप बातम्या पसरल्या होत्या. परंतु काही कारणांवरुन त्यांच्यात बिनसलं
4/8

स्नेहा उल्लाल : सलमान खान ऐश्वर्या रायसारखी दिसणाऱ्या स्नेहा उल्लाल या टॉलिवूड अभिनेत्रीचा प्रेमातही पडला. परंतु अवघ्या काही महिन्यांमध्ये हे नातंदेखील तुटलं. स्नेहाने सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या आर्यन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
5/8

संगीता बिजलानी : अभिनेत्री संगीता बिजलानीला सलमानचे पहिले प्रेम मानले जाते. सलमान-संगीता लग्न करणार होते. लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या होत्या. परंतु हे लग्न होऊ शकलं नाही.
6/8

लुलिया वंतूर : गेल्या काही महिन्यांपासून सलमानचे नाव रशियन अभिनेत्री लुलिया वंतूर हिच्याशी जोडले जात आहे. लुलिया सलमानच्या घरगुती कार्यक्रमांमध्येही सहभागी होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यांची जोरदार चर्चा आहे.
7/8

कतरिना कैफ : मैंने प्यार क्यों किया या चित्रपटात सलमान-कतरिना जोडीने एकत्र काम केले. या चित्रपटापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु काही कारणास्तव दोघांमध्ये दुरावा आला.
8/8

क्लॉडिया सिएस्ला : सलमानचे नाव पोलंडमधील मॉडेल क्लॉडिया सिएस्ला हिच्यासोबतही जोडले गेले. परंतु हे नाते फार काळ टिकले नाही. क्लॉडियाने अक्षय कुमारच्या खिलाडी 786 चित्रपटात 'बलमा' हे आयटम साँग केले आहे. तसेच 'क्या कूल है हम' चित्रपटात शकुंतलाची भूमिका केली होती.
Published at : 27 Dec 2018 09:23 AM (IST)
Tags :
Salman KhanView More
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























