एक्स्प्लोर
IPL10 : शंभर फलंदाजांना माघारी धाडणारा कार्तिक एकमेव विकेटकीपर
1/6

दिनेश कार्तिकच्या अर्धशतकीय खेळीनंतरही गुजरात लायन्सला पराभवाचा सामना करावा लागला. किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्सचा 26 धावांनी पराभव करुन आपला यंदाच्या आयपीएल मोसमातला तिसरा विजय नोंदवला.
2/6

दिनेश कार्तिकने 146 सामन्यांमध्ये 26 स्टम्पिंग आणि 74 झेल घेत हा विक्रम नोंदवला.
3/6

मात्र या इनिंगमध्ये विकेटकीपर दिनेश कार्तिकने आयपीएल इतिहासातल्या अशा विक्रमाला गवसणी घातली, जो विक्रम आतापर्यंत एकही विकेटकीपर करु शकलेला नाही.
4/6

गुजरातच्या गोलंदाजी दरम्यान अँड्र्यू टायने 2, शुभम अग्रवाल, रवींद्र जाडेजा, नाथू सिंह आणि ड्वेन स्मिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
5/6

आयपीएलच्या इतिहासात 100 फलंदाजांना माघारी धाडणारा दिनेश कार्तिक एकमेव विकेटकीपर ठरला आहे.
6/6

कार्तिकनंतर पुण्याचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने 94 फलंदाजांना माघारी धाडण्यात योगदान दिलं आहे.
Published at : 24 Apr 2017 11:37 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























