एक्स्प्लोर
राजधानी दिल्लीत हिंसाचाराचे मन हेलावून टाकणारे फोटो व्हायरल

1/10

या आंदोलनामुळे वाहतूक पूर्ण ठप्प असून शाळांनाही सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. तरी, सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झालाय.
2/10

नागरिकत्व दुरुस्ती काय़द्याच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दोन दिवसांपासून मोठा तणाव या भागात पाहायला मिळतोय. तर, जाफराबादेत आजही तणावपूर्ण शांतता आहे.
3/10

दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर भागात सीएए विरोधक आणि समर्थक यांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झालाय. तर 37 पोलिस गंभीर जखमी झालेत.
4/10

या हिंसाचारात अनेकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी सरकारी आणि खासगी मालमत्तेच नुकसान झालं आहे.
5/10

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच आंदोलनाला हिंसक वळण लागलंय का?, असा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांचा तपास सुरु केला आहे.
6/10

या हिंसाचाराची तीव्रता पाहता सोमवारपासूनच दिल्लीतील अनेक भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर काही मेट्रो स्टेशनही बंद ठेवण्यात आलेत.
7/10

गृहमंत्री अमित शाहांनी तात्काळ बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला.
8/10

दरम्यान या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांच्या कांड्याही फोडल्या. तर जमावाने एक पेट्रोल पंपही पेटवून टाकला.
9/10

आंदोलकांनी अनेक ठिकाणी खासगी वाहनांची जाळपोळ केली आहे.
10/10

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे.
Published at : 25 Feb 2020 08:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion