‘एज्युकेट द चाईल्ड’ या कार्यासाठी आणि भारतीय हँडलूमच्या प्रमोशनसाठी त्यांनी या फॅशन शोमधे सहभाग घेतला. मुलींच्या शिक्षणाविषयी जागृती करणं हा आपला मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
2/4
पुण्यातील चासा फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हँडलूम वस्त्र घालून त्यांनी रॅम्पवॉक केला. शो स्टॉपर म्हणून अमृता फडणवीस रॅम्पवर उतरल्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चासा फॅशन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी हे शेतकरी, कामगार यासारख्या गरीब पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत.
3/4
मात्र आता मिसेस मुख्यमंत्रींनी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. ही उपस्थिती फॅशन शो पाहण्यासाठी नव्हती, तर त्यांनी चक्क रॅम्पवॉक केला.
4/4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी बँकिंगसोबतच पार्श्वगायनाच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.