टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने झिम्बाब्वे विरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी मैदानात उतरताच मोठं रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे.
2/5
यापूर्वी पाकिस्तानचे सईद अजमल आणि उमर अकमल यांनी एका वर्षात सर्वाधिक 18 सामने खेळण्याचं रेकॉर्ड केलं होतं. धोनी आणि बुमरा यांनी 19 सामने खेळले आहेत.
3/5
धोनी आणि भारताचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराने एका वर्षात सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने खेळण्याचं रेकॉर्ड आपल्या नावे केलं आहे.
4/5
धोनी आणि पाँटींगच्या नावे सर्वाधिक 324 आंतरराष्ट्रीय सामन्यांचं नेतृत्व करण्याचं रेकॉर्ड आहे. पुढच्या सामन्यात धोनी सर्वाधिक सामन्यांच नेतृत्व करणारा जगातील पहिलाच कर्णधार होईल.
5/5
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामन्याचं नेतृत्व करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटींगची बरोबरी साधली आहे.