यंदा ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आपल्यापेक्षा रँकिंगमध्ये वरचढ असलेल्या खेळाडूंवर मात केली आहे. सिंधूनं सेमी फायनलमध्ये जपानच्या वर्ल्ड नंबर सिक्स नोझोमी ओकुहाराला हरवलं. त्याआधी उपांत्यपूर्व लढतीत तिनं चीनच्या वांग यिहानला हरवलं होतं आणि बॅडमिंटन कोर्टवर चीनच्या वर्चस्वाला तडा दिला होता. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठेपर्यंत सिंधूनं केवळ एकच गेम गमावला आहे.
2/11
सुरूवातीला सिकंदराबादमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूनं इंडियन रेल्वे इंजीनियरिंग आणि दूरसंचार इन्स्टिट्यूटच्या बॅडमिंटन कोर्टवर सराव केला. मग ती पुलेला गोपीचंदच्या मार्गदर्शनाखाली सराव करू लागली. त्या काळात सिंधूचे वडील तिला रोज 56 किलोमीटर दूर अॅकडॅमीत सरावासाठी घेऊन जायचे. सिंधूमधली मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द त्याही वयात उठून दिसायची.
3/11
Silver medalist India's Pusarla V. Sindhu celebrates on the podium following the women's singles Gold Medal badminton match at the Riocentro stadium in Rio de Janeiro on August 19, 2016, for the Rio 2016 Olympic Games. / AFP PHOTO / GOH Chai Hin
4/11
5/11
पीव्ही सिंधूने आज भारतीय बॅडमिंटनला नव्या शिखरावर नेलं आहे. अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच सिंधू आज ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचू शकली.
6/11
बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी सिंधू ही सायना नेहवालनंतर दुसरी खेळाडू ठरली.
7/11
8/11
रिओ ऑलिम्पिकमध्ये ती भारताची दुसरी पदकविजेती ठरली.
9/11
भारताच्या पी. व्ही. सिंधूनं बॅडमिंटनच्या महिला एकेरीत रौप्यपदकाची कमाई करून ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवला.
10/11
स्पेनच्या कॅरोलिना मरिननं फायनलमध्ये सिंधूचा संघर्ष 19-21, 21-12, 21-15 असा मोडून काढला. त्यामुळं सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
11/11
रिओ ऑलिम्पिकच्या रणांगणात भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पण महिला एकेरीच्या फायनलमध्ये सिंधू वर्ल्ड नंबर वन आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मरिनशी ज्या जिद्दीनं लढली ती पाहता साऱ्या भारतीयांसाठी सिंधू ही सुवर्णकन्याच ठरली.