आता ती पंजाबी चित्रपट 'जग्गा जेऊंदा ए'मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
2/8
याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पष्टीकरणही दिलं आहे. पंजाब पोलिस दलातील एसएचओ असल्याचं सांगून माझे फोटो शेअर केले जात आहेत. पण ते चुकीचं आहे, असं कायनात म्हणाली.
3/8
सोशल मीडियावर कायनातचे फोटो येताच व्हायरल झाले. ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सअॅपवर ते शेअर होऊ लागले.
4/8
चित्रीकरणादरम्यान कोणीतरी माझे फोटो काढून, पंजाब पोलिस दलातील नवी एचएसओ असं सांगून शेअर केले आहेत, असं कायनात म्हणाली.
5/8
खरंतर हे फोटो अभिनेत्री कायनात अरोराचे आहेत. पंजाबी चित्रपट 'जग्गा जेऊंदा ए'साठी ती पोलिसांच्या वेशात आहे.
6/8
कायनातने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2010 मध्ये अक्षय कुमारच्या 'खट्टा-मीठा' सिनेमातून केली होती. यानंतर ती 2013 मधील 'ग्रॅण्ड मस्ती'मुळे चर्चेत आली. ती मल्याळी चित्रपट लैला ओ लैला, तामीळचा मनकथा, पंजाबी सिनेमा फरारमध्ये दिसली आहे.
7/8
फोटोमध्ये पंजाब पोलिसांच्या वर्दीत दिसणाऱ्या महिलेचं नाव हरलीन कौर असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु या फोटोंमागील सत्य वेगळंच आहे.
8/8
सोशल मीडियावर सध्या ह्या महिला पोलिसाचे फोटो व्हायरल होत आहेत. नेटीझन्सच्या मते ही महिला पंजाब पोलिस दलातील नवी एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर)आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.