समाधी मंदिरातील फुलांच्या सजावटीने साई भक्तांचे लक्ष वेधलं. तर हैद्राबाद येथील साई भक्ताने साई समाधी मंदिरासमोरील पटांगणात टरबुजावर साईंच्या जीवनावरील विविध प्रतिकृती साकारल्याचं दिसून आलंय.
2/10
साईबाबा संस्थाननेही एकादशीचं महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादलायात 12 हजार किलोचा खिचडी प्रसाद बनवला आहे. दिवसभरात 60 हजार भाविक या खिचडी प्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
3/10
साईबाबा संस्थाननेही आषाढी एकादशीचं महत्वं लक्षात घेऊन विठ्ठलाची प्रतिमा समाधीवर ठेवून साईबाबांच्या मूर्तीला तुळशीची माळ अणि सुवर्ण आभूषणे चढवली आहे. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते. मात्र फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते.
4/10
पाहा आणखी फोटो...
5/10
साईबाबांच्या मंदिरात ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती नित्यनेमाने म्हटली जाते. त्याचीच प्रचिती आज साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने दिसून येते. विठ्ठल-रुक्मिणीचा फोटो साईसमाधी मंदिरात ठेऊन आज साईबाबांची माध्यान्ह आरती करण्यात आली.
6/10
पाहा आणखी फोटो...
7/10
8/10
पाहा आणखी फोटो...
9/10
10/10
महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मादियाळी पंढरपुरात दिसून येत असताना, शिर्डीत साईबाबांना विठ्ठलरुप माननाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे, तर समाधी मंदिरातील फुलांच्या सजावटीनेही साईभक्तांचे लक्ष वेधलं आहे.