टाटा टियागो (TATA Tiago): हॅचबॅक कार घ्यायची असेल तर टाटा टियागो एक उत्तम कार आहे. कंपनीने नुकतच या कारचं लिमिटेड एडिशन लॉन्च केलं आहे. टाटा टियागोमध्ये बीएस 6 इंजिन आहे. कंपनीने या कारचे 6 वेरियंट लॉन्च केले आहेत. या कारची किंमत 4 लाख 60 हजारपासून सुरू होते. या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 86 Ps पावर आणि 113Nm ची टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर ही कार 23 किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज देते.
2/6
रेनॉल्ट किगर (Renault Kiger) : सर्वात स्वस्त सब कॉम्पॅक्ट SUV कारमध्ये रेनॉल्ट किगरचा समावेश आहे. या कारची किंमत 5 लाखांपासून सुरु होते. सब कॉम्पॅक्ट SUV किगारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. बीएस 6 हे प्रमाणित 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 71 bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन एक 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 99 bhp ची पावर आणि 160Nm ची टॉर्क जनरेट करते. किजरचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीटीव्ही गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. कमी बजेटमध्ये SUV चा आनंद घेणाऱ्यांसाठी ही कार सर्वोत्तम पर्याय आहे.
3/6
मारुती वॅगनआर (Maruti Wagon R) : हॅचबॅकमध्ये मारुती वॅगन आर कार देखील चांगला पर्याय आहे. वॅगनआर ही भारतातील सर्वाधिक विक्री करणार्या कारपैकी एक आहे. वॅगनआर मध्ये 1.2 लीटर इंजिन आहे, जे 83 Pc पावर आणि 113Nm ची टॉर्क जनरेट करते. बजेट कारमध्ये ही कार उत्तम पर्याय आहे. वॅगनआर कारची किंमत 4.66 लाख रुपयांपासून सुरु होते.
4/6
मारुती अल्टो 800 (Maruti Alto 800) : मारुतीच्या सर्वात जुन्या कारपैक अल्टो 800 देखील एक उत्तम पर्याय आहे. यावर्षी अल्टोची नवीन एडिशनही बाजारात येणार आहे. अल्टो कारची किंमत 2.99 लाखांपासून सुरु होते. या कारमध्ये 0.8 लीटर बीएस 6 स्टँडर्ड इंजिन आहे. जे 48ps पॉवर आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करते. ऑल्टो 22.5Kmpl चे मायलेज देते.
5/6
रेनॉल्ट क्विड (Renault KWID) : रेनॉल्ट क्विड ही कार पॉवर स्टीयरिंग आणि टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम सारख्या बर्याच हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे. या कारची किंमत 2.92 लाख रुपयांपासून सुरु आहे. या कारमध्ये 1.0-लीटर बीएस 6 इंजिन आहे, जे 68 Psची पावर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करते. मायलेजच्या बाबतीतही ही कार पावरफूल आहे. ही कार जवळपास 25.1 किमी प्रतिलीटरचं मायलेज देते.
6/6
यावर्षी तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा आपली जुनी कार अपग्रेड करायची असेल तर बाजारात बरेच नवीन आणि चांगले पर्याय आहेत. पाच लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मारुती, रेनॉल्ट आणि टाटाकडून उत्तम कार उपलब्ध आहेत.