एक्स्प्लोर
IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा, विकेट्स, कॅच, षटकार कुणाचे? हे खेळाडू आघाडीवर
ipl1
1/6

आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक धावा दिल्लीचा सलामीवीर शिखर धवननं केल्या आहेत. त्याने 8 सामन्यांत 380 धावा केल्या आहेत. सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीतही शिखर धवन अव्वल क्रमांकावर असून त्याने 8 सामन्यांत 43 चौकार ठोकले आहेत. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर 331 धावांवर पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल आहे.
2/6

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेल आहे. त्याने 7 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आहेत.
3/6

आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम मुंबईच्या कायरन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने 17 चेंडूत अर्धशतक केले आहे. याशिवाय सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम कायरन पोलार्डने केला असून त्याने 105 मीटरचा षटकार मारला होता.
4/6

चेन्नईचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या नावावर सर्वाधिक झेल घेतले आहे. नेहमीच आपल्या उत्तम क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जडेजाने 7 सामन्यांत 8 झेल घेतले आहेत.
5/6

आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार केएल राहुलच्या नावावर असून त्याने 7 सामन्यांत 17 षटकार मारले आहेत.
6/6

आयपीएल 2021 मध्ये 3 खेळाडूंनी शतक झळकावली आहेत. यात संजू सॅमसन, देवदत्त पडीक्कल आणि जोस बटलर यांचा समावेश आहे.
Published at : 19 Sep 2021 03:36 PM (IST)
आणखी पाहा























