एक्स्प्लोर
Rinku Singh : रिंकू सिंगची फटकेबाजी, चौकार षटकारांचा पाऊस, अर्धशतक हुकलं पण सूर्याचे 'ते' विक्रम मोडले
Rinku Singh : रिंकू सिंगनं आज झिम्बॉब्वे विरुद्ध 22 बॉलमध्ये 48 धावा केल्या. यामध्ये चौकार षटकार मारले. रिंकू पहिल्या टी 20 मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला होता.
रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव
1/5

भारतानं झिम्बॉब्वे विरूद्धच्या दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये 100 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगनं ऋतुराज गायकवाडसोबत 87 धावांची भागिदारी केली.
2/5

रिंकू सिंगनं 22 बॉलमध्ये 48 धावांची खेळी केली. रिंकूनं यामध्ये दोन चौकार आणि पाच सिक्सर मारले. भारतानं 234 धावा केल्या यामध्ये रिंकूच्या 48 धावा देखील महत्त्वाच्या ठरल्या.
3/5

रिंकू सिंगनं आजच्या मॅचमध्ये 22 बॉलमध्ये 48 धावा केल्या. रिंकूचं जरी अर्धशतक हुकलं असलं तरी त्यानं सूर्यकुमार यादवचे दोन रेकॉर्ड मोडले आहेत.
4/5

रिंकू सिंग 20 व्या ओव्हरमध्ये शानदार स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. रिंकूनं 336.36 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली. सूर्यकुमार यादवनं 20 व्या ओव्हरमध्ये 321.43 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केलेली आहे.
5/5

टी 20 मध्ये 19-20 व्या ओव्हरमध्ये षटकार मारणारांच्या यादीत चौथ्या स्थानावर रिंकू सिंग पोहोचला आहे. रिंकून याबाबतीत देखील सूर्यकुमारला मागं टाकलं. रिंकूनं 48 बॉलमध्ये 17 षटकार मारलेत. तर, सूर्यकुमार यादवनं 45 बॉलमध्ये 14 षटकार मारले आहेत.
Published at : 07 Jul 2024 09:42 PM (IST)
आणखी पाहा























