वेस्ट इंडिजविरोधात अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात भारताचा विजय झाला आहे. हा भारताचा एक हजारावा एकदिवसीय सामना होता.
2/8
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा विकेट्सनी मात देत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
3/8
भारताने वेस्ट इंडिजला अवघ्या 176 धावांमध्ये सर्वबाद केलं आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी टीम इंडियाला 177 धावांचे आव्हान होते.
4/8
रोहितने अप्रतिम सुरुवात करत अर्धशतक झळकावलं, ज्यानंतर सूर्यकुमार आणि दीपक हुडा यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत 28 षटकात विजय मिळवून दिला.
5/8
सामन्यात भारताचे फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तर प्रसिध कृष्णा आणि सिराजने देखील त्यांना साथ दिली.
6/8
भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली.
7/8
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही.
8/8
युझवेंद्र चहलने सामन्यात 9.5 ओव्हर टाकत 49 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने या 4 विकेट्सच्या मदतीने एकदिवसीय क्रिकेटमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने एक अनोखं शतक केलं आहे. चहलच्या आजच्या गोलंदाजीमुळे संघाला मोठा फायदा झाला असून भारतीय संघात त्याचं स्थान यामुळे अधिक पक्क होण्यास मदत होणार आहे.