एक्स्प्लोर
IND vs SA : पहिल्याच सामन्यात भारताचा धुव्वा, भारताचा सात गड्यांनी पराभव, द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी
IND vs SA
1/9

IND vs SA, Match Highlights: डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
2/9

दक्षिण आफ्रिेकाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्यातून वगळण्यात आले.
Published at : 09 Jun 2022 11:06 PM (IST)
आणखी पाहा























